Home अहमदनगर अहमदनगर: अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

अहमदनगर: अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Rahuri finding the body of an unidentified woman

Rahuri | राहुरी:  पिंपळगाव फुणगी शिवहद्दीत प्रवरा उजव्या कालव्यात एका 40 वर्षीय अज्ञात अनोळखी महिलेचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह (Dead body) पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

गुहा-पिंपळगाव शिव हद्दीतील प्रवरा उजवा कालव्यातून रोटेशन सुरु असून बुधवारी दुपारी एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्यानचे स्थानिक नागरिकांना आढळून आल्यानंतर येथील पोलीस पाटील व सरपंच यांना या मृतदेहाबाबतची माहिती देण्यात आली. त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात सदर घटनेची माहिती कळवली.

वाचा: Ahmednagar News

त्यानुसार राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी यांच्यासह सहायक फौजदार एन. आर. शिंदे, पो. हे. काँ. लक्ष्मण बोडखे घटनास्थळी दाखल झाले. प्रवरा उजव्या कालव्यातील पाण्यावर तरंगत असलेला महिलेचा मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह पुर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. सदर मृतदेह हा कुणाचा आहे याबाबत अजून माहिती मिळालेली नाही.

Web Title: Rahuri finding the body of an unidentified woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here