Home क्राईम संगमनेर तालुक्यातील घटना: तंटामुक्ती अध्यक्षानेच केली मारहाण

संगमनेर तालुक्यातील घटना: तंटामुक्ती अध्यक्षानेच केली मारहाण

Sangamner Crime News President himself was beaten up

संगमनेर | Crime News | Sangamner: गावातील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षानेच राग अनावर झाल्यामुळे त्यांनी एकास मारहाण केल्याची घटना घडली आहे. संगमनेर तालुक्यात पठार भागातील माहुली (खंदरमाळ) येथे शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गाजवळ घडली.

बोलण्यात केलेल्या अडथळ्याच्या कारणातून झालेल्या बाचाबाचीतून एकमेकांवर दगडांनी प्रहार करण्यात आला. याप्रकरणी दोघांनीही घारगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे. या घटनेतील एक जण तंटामुक्तीचा अध्यक्ष असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अशोक काशिनाथ गाडेकर वय रा. माहुली यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शुक्रवारी सकाळी महामार्ग टोलनाक्यावरील काही कर्मचाऱ्यांशी बोलत उभे असताना रामनाथ कजबे यांनी बोलण्यात हस्तक्षेप केला. या वादातून कजबे यांनी डोक्यात दगड मारून गाडेकर यांना जखमी केले.

रामनाथ भाऊसाहेब कसबे वय ५६ रा. खंदरमाळवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, कजबे गावातील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आहेत. शुक्रवारी सकाळी हॉटेल राजस्थानजवळ गर्दी झालेली पाहून कजबे तेथे गेले. त्याठिकाणी अशोक गाडेकर हे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना अरेरावी करीत असल्याने तंटामुक्ती या नात्याने त्यांनी हस्तक्षेप केला. या गोष्टीचा कजबे यांना राग आल्याने त्यांनी कानाजवळ दगड मारून जखमी केले. तसेच गाडेकर यांची पत्नी वैशाली, भाऊ सुनील, भावजय स्वाती या तिघांनी शिवीगाळ करीत खाली पाडून कजबे यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी परस्परविरोधी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र लांघे अधिक तपास करीत आहे.

Web Title: Sangamner Crime News President himself was beaten up

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here