Home अहमदनगर धक्कादायक: माहेरून पैसे आणण्यासाठी महिलेच्या डोक्यावरील केस कापून घरातून हाकलले

धक्कादायक: माहेरून पैसे आणण्यासाठी महिलेच्या डोक्यावरील केस कापून घरातून हाकलले

Crime News cut off the woman's hair and drove her out of the house to bring money

नेवासा | Crime News | Newasa:  चारचाकी गाडी  घेण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणावेत या मागणीसाठी महिलेच्या डोक्यावरील केस कापून तसेच मारहाण करुन तिला घरातून हाकलून देवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे घडली आहे. याबाबत पतीसह सासू व सासर्‍यांवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पल्लवी किशोर भगत (वय 25) रा. नजन वस्ती सलाबतपूर ता. नेवासा हिने फिर्याद दाखल केली आहे.  फिर्यादीत म्हंटले आहे की, 28 जुलै 2018 रोजी लग्न झाल्यानंतर सहा महिने ते 15 डिसेंबर 2021 या काळात सासरी नांदत असताना पती किशोर अर्जुन भगत याने आई-वडिलांकडून चारचाकी गाडी घेण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत यासाठी वेळोवेळी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. सासू सरस्वती अर्जुन भगत व सासरे अर्जुन काशिनाथ भगत यांनी वेळोवेळी उपाशी ठेवून वाईट शिवीगाळ केली.

15 डिसेंबर 2021 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पती किशोर अर्जुन भगत याने पैसे का आणत नाहीस? असे विचारले. त्यावर आई-वडील गरीब असल्याने पैसे देवू शकणार नाहीत. असे सांगितल्याचा राग आल्याने त्याने डोक्यावरचे केस कात्रीने कापून घरातून काढून दिले. या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास हवालदार नितीन भताने करत आहेत.

Web Title: Crime News cut off the woman’s hair and drove her out of the house to bring money

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here