राज्याचे टेन्शन वाढले: राज्यात ओमायक्रॉनचे ८ रुग्ण वाढले
मुंबई | Corona News Update Omicron 8 : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ओमायक्रॉनचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने टेन्शन वाढले आहे. दिलासादायक बातमी म्हणजे म्हणजे ओमायक्रॉनमुळे राज्यात अजून एकही मृत्यू झालेला नाही. आज पुन्हा एकदा राज्यात ऑमायक्रॉनचे ८ रुग्ण सापडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार 8 पैकी 4 रुग्ण मुंबई विमानतळ सर्वेक्षणातील तर 3 रुग्ण सातारा येथील आणि एक रुग्ण पुणे मनपा क्षेत्रातील आहे. राज्यात एकूण 48 ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी मुंबईत 18, पिंपरी चिंचडवडमध्ये 10 पुणे ग्रामीणमध्य 6 आणि पुणे मनपा भागात 3 रुग्ण आढळले. सातारा 3, कल्याण डोंबिवली 2, उस्मानाबाद 2, बुलढाणा 1, नागपूर, लातूर आणि वसई विरारमध्ये प्रत्येकी एक ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. 28 रुग्णांना त्यांची RTPCR चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नवीन नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे.
Web Title: Corona News Update Omicron 8