Home Accident News शोषखड्ड्यात पडून चिमुकलीचा मृत्यू, संगमनेर तालुक्यातील दुर्दैवी घटना

शोषखड्ड्यात पडून चिमुकलीचा मृत्यू, संगमनेर तालुक्यातील दुर्दैवी घटना

Sangamner Accident Chimukali dies after falling into abyss    

संगमनेर | Sangamner Accident: संगमनेर तालुक्यातील माहुली येथील नाशिक पुणे महामार्गालगत हॉटेल निलायमसमोर असलेल्या शोषखड्ड्यात पडून साडे पाच वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. दानवी उर्फ परी दर्शन मंचरे वय ५०५ वर्ष रा. गणेशनगर, सप्तशृंगी मंदिरासमोर अकोले बायपास रोड संगमनेर असे या मयत चिमुकलीचे नाव आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, माहुली येथील हॉटेल निलायमने सांडपाणी मुरविण्यासाठी पुढील बाजूस शोषखड्डा मारला आहे. खड्ड्यालगत पाणी उडविणारे कारंजे आहेत. दर्शन तात्यासाहेब मंचरे व त्यांची मुलगी दानवी उर्फ परी हे रवींद्र बाबासाहेब लेंडे रा. खंदरमाळवाडी यांच्याकडे कामानिमित्त आले होते. ते घरी परतत असताना हॉटेल निलायम येथे थांबले होते. हॉटेल निलायम लगतच्या हॉटेलसमोर एका बसने अचानक पेट घेतल्याने दोघांचेही लक्ष त्या बसकडे गेले. त्याच दरम्यान परी खेळत खेळत समोरील कारंजाकडे गेली. खेळ खेळत असताना परी अचानक कारंजालगत असलेल्या खड्ड्यात पडली. खड्ड्यातून परीला बाहेर काढत तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करत परीला मयत घोषित केले.    

Web Title:  Sangamner Accident Chimukali dies after falling into abyss    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here