Home अहमदनगर दहा लाख रुपयाची खंडणी मागणीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

दहा लाख रुपयाची खंडणी मागणीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Crime News registered against three persons for demanding ransom of Rs 10 lakh

नेवासा | Crime news:  जमीन खरेदी-विक्री करत असलेल्या व्यक्तीला दहा लाख रुपयाची खंडणी मागितल्याने सोनई येथील तीन व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जमिनीवर लिज पेंडन्सी टाकणेकरीता पैसे घेऊन माघार घेणे तसेच एका बँकेची फसवणूक केली, ते उजेडात न येण्यासाठी प्रकाश पोपट शेटे याच्यासह अज्ञात दोघांनी दहा लाख रुपयांची मागणी केल्याची फिर्याद पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र तख्तमल गुगळे यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाण्यात शेटे यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादीत म्हटले की, सोनई येथील मार्केट कमिटीच्या ठिकाणी पोपट शेटे यांनी वेळोवेळी कर्ज फसवणूक प्रकरणी दहा लाख रुपये दे, नाहीतर प्रकरण उजेडात आणून देईल, या भीतीपोटी गुगळे यांनी स्वतःचा व्यवस्थापक अमोल शिंदे यांच्याकडे पाच लाख रुपयांचा धनादेश देऊन स्टेट बँक मधून पाच लाख काढून सचिन पवारकडे दिले, ते पाच लाख रुपये फिर्यादी यांच्या प्लॉटच्या मागच्या बाजूला मार्केट कमिटी येथे दिले. त्या वेळेस दोन इसम तोंडाला काहीतरी मफलरने बांधून विनानंबर मोटारसायकल वरून येऊन म्हणाले की, प्रकाश भाऊ दिल्लीला आहे, तू त्याचे मिटवणार आहे की नाही, एकदाच सांग, नाहीतर तुझा कायमचा काटा काढू असे म्हणून मला शिवीगाळ व धमकी देत संगनमताने दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. या फिर्यादीवरून पोपट शेटे याचेविरुद्ध गुन्हा रजि. नं. 394/21 भादंवि कलम 385, 386, 387, 109, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. मिसाळ करत आहेत.

Web Title: Crime News registered against three persons for demanding ransom of Rs 10 lakh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here