Home क्राईम संगमनेर: संस्थेच्या सचिवाने मुलांच्या आहारासाठी शासनाकडून मिळालेल्या १८ लाखांचा केला अपहार

संगमनेर: संस्थेच्या सचिवाने मुलांच्या आहारासाठी शासनाकडून मिळालेल्या १८ लाखांचा केला अपहार

Sangamner Crime News secretary of the organization embezzled Rs 18 lakh from the government 

संगमनेर | Sangamner Crime News: मुलांच्या आहारासाठी शासनाकडून पुरविण्यात आलेले १८ लाख २० हजार परस्पर बँकेतून काढून संस्थेची फसवणूक करणाऱ्या संस्थेच्या सचिवाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिवासी सर्वांगीण विकास सेवाभावी संस्था कोळवाडे या संस्थेत सचिवाने अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब बबन घोडे रा. कोळवाडे ता. संगमनेर यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

निवृत्ती शंकर घोडे मूळ रा. कोळवाडे हल्ली रा. जनतानगर ता. संगमनेर असे या गुन्हा दाखल झालेल्या सचिवाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, १ नोव्हेंबर २०१९ ते २ मार्च २०२० या कालावधीत हा अपहार झाला. २०१८ मध्ये अकोले तालुक्यातील आदिवासी प्रकल्प कार्यालया अंतर्गत घोडे यांच्या संस्थेने निविदा भरल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या संस्थेला राहता तालुक्यातील प्रवरानगर येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, संगमनेर आदिवासी मुलांचे जुने वसतीगृह आणि घुलेवाडी येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह येथे भोजन पुरविण्याबाबत आदेश प्राप्त झाला होता. भोजन ठेक्यासाठी लागलेला किराणा माल,इतर साहित्य, कामगारांचे पगार, भाजीपाला याचे शासनाकडून पैसे मिळालेले होते. सचिन निवृत्ती घोडे याने स्वतः च्या नावाने वेळोवेळी विद्यानगर येथील स्टेट बँक येथे पैसे काढून घेतले. ते संबंधित दुकानदारांना न देता स्वतःच्या फायद्यासाठी पैसे काढत १८ लाख २० हजार रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे पुढील तपास करीत आहे.  

Web Title: Sangamner Crime News secretary of the organization embezzled Rs 18 lakh from the government 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here