महिलेस मारहाण व जीवे मारण्याची धमकी
राहुरी | Rahuri Crime news: राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे एका वयोवृद्ध महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २७ डिसेंबर रोजी घडली. तुमच्या मुलाला हात उसने दिलेले पैसे परत द्या. नाहीतर तुमचे घर माझ्या नावावर करून द्या. असे म्हणत आरोपी सतीश वाघ याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
याबाबत तस्लीम बेगम मशीहूल हसन खान (वय वर्षे 50, रा. समर्थ नगर, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, सकाळी साडे अकरा वाजे दरम्यान तस्लीम बेगम खान या त्यांच्या घरात होत्या. त्यावेळी तेथे आरोपी सतीश वाघ व इतर तीन अनोळखी इसम हे तस्लीम बेगम खान यांच्या घरात घुसले. त्यांना म्हणाले, तुमच्या मुलाला हात उसने दिलेले पैसे परत द्या. नाहीतर तुमचे घर माझ्या नावावर करून द्या. यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचा राग आल्याने आरोपींनी तस्लीम बेगम खान यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.
तस्लीम बेगम खान यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सतीश आनंदा वाघ रा. अंबिका नगर, राहुरी फॅक्टरी तसेच फॅक्टरी परिसरातील इतर तिघेजण अशा चौघांवर मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक नाईक हे करीत आहेत.
Web Title: Rahuri Crime News Women beaten and threatened with death