Home Accident News मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याचे कळताच आईनेही सोडला प्राण

मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याचे कळताच आईनेही सोडला प्राण

Mother also died when she found out that her son had died in an accident

राजुरी | Rahata Accident News:  मुलाचा अपघातात (Accident) मृत्यू झाल्याची वरता कळताच  आईला तो धक्का सहन न झाल्याने हृयदयविकाराचा तीव्र झटका येऊन काही तासांतच आईनेही जीव सोडल्याची घटना घडली आहे. या दोघांचाही अंत्यविधी एक़ाचवेळी प्रवरानगर येथील अमरधाममध्ये करण्यात आला. या घटनेने प्रवरानगर व लोणी खुर्द परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत माहिती अशी की, मंगळवारी संध्याकाळी लोणीहून प्रवरानगर येथील आपल्या घरी जाण्यासाठी राजेंद्र दत्तात्रेय गागरे हे निघाले होते. राहाता तालुक्यातील लोणी-कोल्हार रोडवर, प्रवरानगर येथील आहेर वस्ती (लोणी खुर्द) येथे अपघात झाला. या अपघातात राजेंद्र दत्तात्रय गागरे यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती घेऊन पोलिसांनी मृतदेह लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलला शवविच्छेदनासाठी पाठविला होता. बुधवारी सकाळी त्यांच्या शवविच्छेदनानंतर राजेंद्र गागरे यांचा अंत्यविधी होणार होता. याचदरम्यान त्यांच्या आई नलिनी दत्तात्रेय गागरे यांना या घटनेची माहिती कळाली. मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी कळाल्यानंतर त्यांना मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांनाही ताबडतोब हॉस्पिटलला नेण्यात आले; परंतु त्यांचेही निधन झाले. मुलाचा आणि आईचा एकाच दिवशी मृत्यूची बातमी कळताच परिसरातील नागरिकांनी एक़च गर्दी केली होती. हा हृदयद्रावक प्रसंग पाहून नागरिकांनाही अश्रू आवरता आले नाहीत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.  

Web Title: Mother also died when she found out that her son had died in an accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here