Home Accident News डंपर व मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात, पती पत्नी जागीच ठार

डंपर व मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात, पती पत्नी जागीच ठार

Shrirampur Husband and wife killed on the spot in a tragic accident 

श्रीरामपूर | Shrirampur Accident News:  श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर-मांलुजा रस्त्यावर काल दुपारी मुरूम व माती वाहतूक करणार्‍या डंपरने मोटारसायकला जोराची धडक दिल्याने या भीषण अपघातात (Accident)  मांजरी ता. राहुरी येथील पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल सकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील मांजरी येथील काशिनाथ गणपत कोळेकर (वय 50) आदिकाबाई काशिनाथ कोळेकर (वय 46) हे दोघे पती-पत्नी कामानिमित्त एम.एफ. डिलक्स मोटारसायकलवरून बेलापूरकडे चालले होते. भेर्डापूर-मालुंजा या दरम्यान समोरून येणार्‍या एम.एच. 21 डी-8977 या डंपर चालकाने भरघाव वेगाने येत  मोटारसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत मोटारसायकलवरील दोघे पती-पत्नी जागीच ठार झाले.

या अपघाताची माहिती मिळताच श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचले. या ठिकाणी मृतदेहाचा पंचनामा करुन घटनेची माहिती घेतली. त्यानंतर दोघा मयत पती-पत्नीचे मृतदेह शवविच्छेदनाकरिता श्रीरामपूर येथे आणण्यात आले. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी केली होती.

Web Title: Shrirampur Husband and wife killed on the spot in a tragic accident 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here