Home क्राईम संगमनेर तालुक्यात घरफोडी; शिक्षिकेस मारहाण लारून दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

संगमनेर तालुक्यात घरफोडी; शिक्षिकेस मारहाण लारून दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

Sangamner Crime:  शिक्षिकेला मारहाण करत घरातून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ७६ हजार रुपयांचा ऐवज लंपास (Theft).

Sangamner Crime teacher was beaten up and theft of cash along with jewellery

संगमनेर | Sangamner News: संगमनेर तालुक्यात चोरी, घरफोडीचे सत्र सुरूच आहे. बोटा परिसरात चोरांचा धुमाकूळ शिक्षिकेला मारहाण करत घरातून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ७६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यावेळी परिसरातील काही घरे फोडण्याचा प्रयत्न केला. चोरीची ही घटना रविवारी दि. १९ फेब्रुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. चोरट्यांनी रात्रभर धुमाकूळ घातला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  मूळचे पोखरी बाळेश्वर येथील रहिवासी असणारे मंगलाबाई पांडुरंग फटांगरे या शिक्षिका नोकरीनिमित्त बोटा येथे कुटुंबासमवेत अनेक वर्षांपासून राहतात. शिक्षिका मंगलाबाई व त्यांचा मुलगा प्रथमेश हे रविवारी रात्री नेहमीप्रमाणे घरात झोपलेले असताना पहाटे ४ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाची कडी उचकटून आत प्रवेश केला. मंगलाबाई यांना जाग आली असता त्यांनी आरडाओरड केल्याने चोरट्यांनी त्यांच्या पाठीत लोखंडी रॉड टाकला. चोरट्यांनी सुमारे तीन तोळ्यांचे ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व १६ हजारांची रोख रक्कम असा एकूण ७६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. प्रथमेशने याबाबत पोलिसांना कळविले. चोरी झाल्याचे समजताच पोलिस निरीक्षक संतोष खेडकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल कैलास देशमुख हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. दोन चोरटे पाहिल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. याबाबत प्रथमेश पांडुरंग फटांगरे (वय २९, रा. बोटा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sangamner Crime teacher was beaten up and theft of cash along with jewellery

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here