खळबळजनक! ६५ वर्षीय वृद्धाचा दोन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार
Ahmednagar Crime News: ६५ वर्षीय वृद्धाने एका दोन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार (abused) केल्याची घटना, श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली.
श्रीरामपूर | Shrirampur News: श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळ्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. ६५ वर्षीय वृद्धाने एका दोन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून गावातच राहणारे इसमाने खेळायला आलेल्या लहान मुलीवर अत्याचार केल्याने पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, खंडाळा गावात राहणारा आरोपी भास्कर मोरे (वय-65) याने त्याच्या घरी खेळण्यासाठी आलेल्या एका दोन वर्षे वयाच्या लहान मुलीवर भर दिवसा चार वाजेच्या सुमारास अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी थेट श्रीरामपूर शहर पोलिसांत जाऊन फिर्याद दिल्याने आरोपीविरुद्ध भादवि कलम 376 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोस्को कायदा कलम ४, ८,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून एसपी राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तातडीने तपास चक्र फिरवत लिंगपिसाट भास्कर मोरे याला अटक केली असून पोसई देवरे हे पुढील तपास करीत आहे.
Web Title: A 65-year-old man abused a two-year-old girl
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App