Home संगमनेर सीआरपीएफ जवान किशोर गडाख अनंतात विलीन

सीआरपीएफ जवान किशोर गडाख अनंतात विलीन

Sangamner CRPF jawan Kishore Gadakh merged into Infinity

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील मनोली येथील सीआरपीएफचे जवान किशोर सुखदेव गडाख यांच्यावर काल शुक्रवारी हजारोंच्या साक्षीनं शोकाकूल वातावरणात मनोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.(CRPF jawan Kishore Gadakh merged into Infinity) यावेळी स्थानिक पोलीस व सीआरपीएफचे दलाच्या जवानांनी गडाख यांना अभिवादन केले तर उपस्थित नागरीकांनी फुलाचा वर्षाव करत त्यांना अखेरचा निरोप दिला.

सीआरपीएफ जवान किशोर गडाख हे मागील १७ वर्षापासून भारतीय सैन्यदलात कार्यरत होते. मागील दोन महिन्यांपूर्वी त्यांना त्रास होत असल्याने दिल्ली येथील सैन्य रुग्णालयात उपचार घेत होते. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  किशोर गडाख यांचा ८ वर्षाचा मुलगा अक्षय याने मुखाग्नी दिला.

गडाख हे मुळचे वांबोरी (ता. राहुरी) येथील असले तरी मागील अनेक वर्षापुर्वी मनोली येथे स्थायिक झाले होते. त्यांचे पार्थिव मनोली येथे आणण्यात आले होते.

मनोली येथील अमरधाममध्ये किशोर गडाख यांचे पार्थिव आणल्यानंतर स्थानिक पोलीस व सीआरपीएफ दलाच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडत मानवंदना देण्यात आली. यावेळी तहसीलदार अमोल निकम, जिल्ह्यातून आलेले माजी सैनिक, महसूलचे अधिकारी व कर्मचारी तसेच पंचक्रोशीतून आलेले मान्यवरांनी अभिवादन केले.

Web Title: Sangamner CRPF jawan Kishore Gadakh merged into Infinity

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here