Home अकोले अकोले पोलिसांची कामगिरी, तालुक्यातील मंदिरांची दानपेटी फोडणारे आरोपी जेरबंद

अकोले पोलिसांची कामगिरी, तालुक्यातील मंदिरांची दानपेटी फोडणारे आरोपी जेरबंद

Akole Accused of breaking temple donation boxes arrested

अकोले | Akole: मागील काही दिवसांपासून अकोले पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मंदिरामधील दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरून नेण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. याप्रकरणी मा. पोलीस अधीक्षक यांनी मंदिर चोरीबाबत सखोल तपास करण्याबाबत आदेश दिलेले होते.

त्यानुसार अकोले पोलीस स्टेशनकडील अधिकारी व कर्मचारी असे पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना दिनांक १३ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास प्रवरा नदीच्या पलीकडे रस्त्याच्या कडेला महालक्षमी मंदिरात अकोले येथे तीन इसम हे संशियीतरीत्या महालक्ष्मी मंदिराच्या गेटजवळ दिसल्याची बातमी मिळाली असता पोलीस व नागरिक हे सदर संशियीताना पकडण्यास गेले असता त्यातील दोन संशियीत इसमांना पकडण्यात यश आले. तसेच एक इसम हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे. पकडलेल्या इसमांना त्याचे नाव गाव विचारता त्यांनी त्याचे नाव मच्छिंद्र पांडुरंग मेंगाळ, राजू ठमा मेंगाळ रा. उंचखडक खुर्द असे सांगितले. त्यांचा तिसरा सहकारी विलास लक्षमण गावंडे हा फरार आहे. त्यांच्याकडून चोरीत वापरलेले साहित्य कटावणी, ग्रांडर, रोख रक्कम व मोटारसायकल जप्त करण्यात आले आहे. त्यांच्या विरुद्ध अकोले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता  त्यांना पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे.

त्यांनी महालक्षमी माता मंदिर अकोले, दत्त मंदिर रुंभोडी, अंबिका माता मंदिर गणोरे, अंबाबाई मंदिर टाहकारी वरीलप्रमाणे मंदिरातील दानपेटी चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांचे घर झडतीमध्ये त्यांच्या कब्जातून दोन मोटारसायकल एक इम्प्लीफायर दोन साउंड, एक दानपेटी, लोखंडी कटवान्या व रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, प.सो.ई.  हंडोरे, पो. ना. अजित घुले, पो. ना. विठ्ठल शेरमाळे, बाळासाहेब गोराणे, गोविंद मोरे, रवींद्र वलवे, पोलीस कॉन्स्टेबल आनंद मैड, गणेश शिंदे, प्रदीप बडे, आत्माराम पवार, संदीप भोसले, नागरे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास अकोले पोलीस स्टेशन कर्मचारी करीत आहे.  

Web Title: Akole Accused of breaking temple donation boxes arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here