भल्या पहाटे उसाच्या शेतात पोलिसांचा छापा अन
जामखेड | Crime News: जामखेड तालुक्यातील वंजारवाडी शिवारात जामखेड पोलिसांनी एका उसाच्या शेतात बांधलेल्या झोपडीत जुगार अड्ड्यावर धाड टाकत सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी १५ जुगारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या छाप्यात चार मोटारसायकल एक झायालो कार, १ लाख ६ हजार रुपये रोख असा एकूण ५ लाख ३५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दादा लक्ष्मण इपार (रा वंजारवाडी), बाळासाहेब हरी भाऊ साठे (रा जवळके), घनश्याम कैलास डोके (रा खर्डा), हनुमंत उत्तम देवकर ( रा रत्नापूर, तालुका परांडा), अजय बबन साठे (रा रत्नपुर, तालुका परंडा), राजेंद्र उद्धव डहाळे (रा तरडगाव), रामा जानू आव्हाड महादेव लक्ष्मण शेतकर, संभाजी सिताराम कराड, संदीप भीमा भोसले (सर्व रा वंजारवाडी), हर्षद नजमो शेख, महेश शहाजी काळे (रा धनेगाव) किरण मुकुंद गोलेकर (रा खर्डा) १४) प्रकाश रामकृष्ण गोलेकर, योगेश अण्णा सुरवसे (रा खर्डा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील एका उसाच्या शेतात जुगार अड्डा सुरू असल्याचे वृत्त जामखेड पोलिसांना मिळाली मिळाले त्यानुसार गुन्हे शोध पथकाने आज पहाटे छापेमारी केली. याठिकाणी उसाच्या शेतात झोपडी बांधून जुगार अड्डा चालवला जात असल्याचे उघडकीस आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलीस नाईक संभाजी शेंडे पोलीस कॉन्स्टेबल संग्राम जाधव, विजय कोळी, अरुण पवार, संदीप आजबे बिराजदार धनराज यांनी ही कारवाई केली आहे. अधिक तपास पोलीस नाईक संभाजी शेंडे करत आहेत.
Web Title: Crime News Raid on a gambling den in a hut built