Home Akole News संगमनेरचे पाच जण या कारणामुळे राजूर पोलिसांच्या ताब्यात

संगमनेरचे पाच जण या कारणामुळे राजूर पोलिसांच्या ताब्यात

Sangamner Five person Arrested in Rajur police crime filed

राजूर | Crime: संगमनेर तालुक्यातील पाच जण रंधा धबधबा या परिसरात काला पिला जुगार खेळताना राजूर पोलिसांच्या ताब्यात सापडले आहे. राजूर पोलिसांनी या पाचही जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून १६०० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना रंधा धबधबा परिसरात संगमनेरातील काही जण काला पिला नावाचा जुगार लावून लोकांना फसवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार साबळे यांनी पथक तयार करून रंधा धबधबा जवळ जुगार खेळणाऱ्या व्यक्तींवर छापा टाकला असता तेथे ५ व्यक्ती काला पिला नावाचा पैसे लावून जुगार खेळताना मिळून आले. यामध्ये भारत नानासाहेब पारधे, रा. घुलेवाडी, बबन मारुती चव्हाण, सलीम पैज्जुदिन शेख अदनन दगडू सय्यद, विशाल नामदेव आव्हाड सर्व रा. दिल्ली नाका संगमनेर यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून १६०० रुपये रोख रक्कम व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले असून त्यांना त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचावर राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भैलुमे, पोलीस शिपाई फटांगरे, गाडे, पटेकर या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Sangamner Five person Arrested in Rajur police crime filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here