Home संगमनेर संगमनेर: मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून तरुणाचा मृत्यू

संगमनेर: मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून तरुणाचा मृत्यू

Sangamner Ghulewadi Young Accident Death

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील पिंपळे शिवारातील वटमाईच्या डोंगराजवळ असणाऱ्या खडी कृषरजवळ पाण्याच्या टाकीसाठी घेतलेल्या खड्ड्यात डंपरने माती टाकत असताना अचानक डंपरचे फाळके निघून डंपरमधील माती अंगावर पडून घुलेवाडी येथील एका तरुणाचा जागीच मृत्यु झाला. ही घटना शनिवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली.

किरण मच्छिंद राउत वय ३५ रा. घुलेवाडी असे या मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, किरण राउत हे एक सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा बांधकाम व्यवसाय होता. पिंपळे येथे एका पाण्याच्या टाकीचे काम सुरु असताना त्यासाठी घेतलेल्या खड्ड्यात डंपरमधून माती टाकली जात होती. डंपरचे फाळके किरण राउत उघडत असताना अचानक ते सटकले आणि त्यांचा जोराचा झटका राउत यांना बसून खड्ड्यात पडले. वरून डंपरमधील माती त्यांच्या अंगावर पडल्याने दबून त्यांचा मृत्यू झाला. या निधनाने घुलेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

Web Title: Sangamner Ghulewadi Young Accident Death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here