Home अहमदनगर उसाचा ट्रॅक्टर व दुधाचा टँकर यांच्यात अपघात चालक ठार

उसाचा ट्रॅक्टर व दुधाचा टँकर यांच्यात अपघात चालक ठार

Ahmednagar Tractor Tanker Accident one death

अहमदनगर | Ahmednagar:  नगर दौंड रोड्वर लोणी व्यंकय्यानाथ बस स्थानकाच्या समोर ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर व दुधाचा टँकर यांच्यात समोरा समोर धडक झाल्याने अपघात घडला.

हा अपघात शुक्रवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात टँकर चालक हा ठार झाला आहे.

राहणार तांदुळवाडी ता. बारामती येथील बाळासाहेब बबनराव यादव वय 60 हा टँकर चालक अपघातात ठार झाला आहे.

दुधाचा टँकर हा बारामती हून नाशिक येथे दूध भरण्यासाठी जात असताना याचवेळी नागवडे साखर कारखान्याकडे जाणाऱ्या उसाच्या टेलरची  व टँकरची समोरा समोर धडक झाली. यामध्ये टँकर चालक बाळासाहेब यादव हे गंभीर जखमी झाले. तेथील स्थानिक तरुणांनी तातडीने बाळासाहेब यांना एका खासगी रुग्णालयात हलविले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू  झाला.

Web Title: Ahmednagar Tractor Tanker Accident one death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here