Home अहमदनगर भैरवनाथ मंदिरातील दानपेटी चोरीस

भैरवनाथ मंदिरातील दानपेटी चोरीस

Karjat Donation box stolen from Bhairavnath temple

कर्जत | Karjat: निमगाव गांगुर्ड या गावतील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. दानपेटी चोरून नेल्यानंतर ग्रामस्थांनी  गाव बंद ठेऊन चोरट्यांना पकडण्याची मागणी केली आहे.

 काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून दानपेटी चोरून नेण्यात आली. ही दानपेट शाळेच्या आवारात नेऊन फोडली व रक्कम लंपास करण्यात आली.

नेहमीप्रमाणे सकाळी मंदिराचे पुजारी व भाविक भाविक दर्शनास आले असता दानपेटी गायब असल्याचे निदर्शनास आले. यावेळी सर्व ग्रामस्थ एकत्र येत या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. गावाचे सरपंच व नागरिक यांनी चोर सापडत नाही तोपर्यंत गाव बंद व रस्ता रोको करण्याचा पवित्रा घेतला आहे. परंतु पोलिसांनी आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले आहे.

Web Title: Karjat Donation box stolen from Bhairavnath temple

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here