नगर सहकारी बँक अध्यक्ष निवडीचा मुहर्त ठरला, कोण होणार कारभारी
अहमदनगर: नगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक शनिवार दिनांक ६ मार्च रोजी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर केला.
अखेर नगर सहकारी बँक अध्यक्ष निवडीचा मुहर्त ठरला आहे. ६ मार्च रोजी निवडणूक अध्यक्ष ठरणार आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत.
बँकेच्या २१ जागांपैकी १७ जागा बिनविरोध झाल्या आहेत तर चार जागेंसाठी मतदान झाले. त्यात महाविकास आघाडीला १५ तर भाजपाला सहा असे संख्याबळ आहे.
आता अध्यक्षपदाचा निर्णय उप मुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे घेणार आहेत. या अध्यक्षपदासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले, राहुल जगताप, जलसंधारण मंत्री शंकराव गडाख, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, जेष्ठ नेते भानुदास मुरकुटे आदी नावांची चर्चा होत असल्याचे समजते. आता जिल्हा बँकेचा कोण होणार कारभारी हे ६ मार्च रोजी जाहीर होईल.
Web Title: Election of Ahmednagar Sahakari Bank Chairman took place