Home संगमनेर संगमनेर तालुक्यात तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

संगमनेर तालुक्यात तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

youth fell into a well and died in Sangamner taluka

संगमनेर | Sangamner: तालुक्यातील खांबे येथे शुक्रवारी सायंकाळी वीज पंपाची केबल काढत असताना तोल जाऊन विहिरीत तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेने शोक व्यक्त होत आहे.

नितीन बापू भोंडे वय ३७ असे या मयत तरुणाचे नाव आहे, संगमनेर तालुक्यातील नेहारवाडी खांबे येथील नितीन भोंडे हा तरुण सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या विहिरीतील वीज पंपाची केबल काढत असताना त्याचा तोल जाऊन विहिरीत पडला. विहिरीत पाणी असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. यावेळी ग्रामस्थांनी त्याला विहिरीच्या बाहेर काढून संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: youth fell into a well and died in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here