Home अहमदनगर सासऱ्यानेच केला सुनेवर अत्याचार, सासरा फरार

सासऱ्यानेच केला सुनेवर अत्याचार, सासरा फरार

Kopargaon Sune was tortured by his father-in-law

कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव तालुक्यातील एका गावात सासर्याने आपल्या सुनेवर जीवे मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून सासऱ्यासह पतीच्या विरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

यामधील महिलेच्या पतीला ताब्यात घेण्यात आले असून सासरा फरार झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील एका गावातील तरुणाशी मे २०१८ मध्ये लग्न झाले. लग्नानंतर तीन महिने सासू, सासरे व सासू हे सुनेशी चांगले वागणूक देत होते. काही दिवसांनी सासऱ्याची वाईट नजर पडली. त्यानंतर सून अंघोळ करताना डोकावणे, चहा दिल्यावर हात पकडणे अशा गोष्टी सासरा करू लागला. ऑगस्ट २०१८ मध्ये एके दिवशी दुपारच्या सुमारास सून एकटी असल्याचे पाहून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. कुणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या आईला ठार मारीन अशी धमकी दिली. सुनेने त्याच रात्री आपल्या पतीला व सासूला हा प्रकार सांगितला. मात्र सुनेचे ह्या दोघांनी  काहीच ऐकले नाही. त्यांनतर  सासर्यानेच त्याच महिन्यात पुन्हा सून घरात एकटी असताना तिच्यावर दोनदा अत्याचार केला. ही बाब पिडीत महिलेने पतीला सांगितले. तुला आनंदाने नांदायचे नाही त्यामुळे तू माझ्या वडिलांवर असे आरोप करतेस. पिडीत महिलेने हा परकार नातेवाईक यांनादेखील सांगितला. डिसेंबर २०१८ मध्ये तुला कायमची माहेरी सोडून देतो असे सांगत पतीने माहेरी सोडले. दोन महिन्यानंतर महिला तिच्या आईसह सासरी आल्यानंतर पतीसह सासू सासरे यांनी घरात घेतले नाही. त्यामुळे ती माहेरी निघून गेली. त्यांनतर काही महिन्यांनी माहेरची मंडळी तिला सासरी पाठविण्याची तयारी करीत असताना पिडीत महिलेने घडलेला प्रकार सांगितला. व सासरी जाण्यास नकार दिला. महिला व नातेवाईक यांनी पोलीस स्टेशन गाठले व सासरा व पती यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे करीत आहे.

Web Title: Kopargaon Sune was tortured by his father-in-law

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here