Home संगमनेर संगमनेर: सारोळे पठाराच्या माजी सरपंच व ग्रामसेवकांनी केला २५ लाखांचा अपहार

संगमनेर: सारोळे पठाराच्या माजी सरपंच व ग्रामसेवकांनी केला २५ लाखांचा अपहार

Sangamner Former Sarpanch and Gram Sevak of Sarole Plateau embezzled

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार येथील माजी सरपंच व ग्रामसेवकाने २०१४ ते २०१८ या कालावधीत शासनाच्या विविध योजनांच्या निधीमधून कोणतेही काम न करता अंदाजपत्रकाचे मुल्यांकन न घेता संगनमत करून २५ लाख २१ हजार ९११ रुपयांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

 याप्रकरणी तत्कालीन सरपंच प्रशांत गवराम फटांगरे व ग्रामसेवक सुनील शंकर शेळके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ग्रामपंचायतमध्ये दोघांनी दिनांक १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत अपहार केला. दोघांनी संगनमत करून शासनाच्या विविध योजनाचा अपहार केला. याबाबत एका सामाजिक कार्यकर्त्याने गटविकास अधिकाऱ्याकडे २५ जानेवारी २०२१ रोजी तक्रार दाखल केली होती. गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी या अपहाराच्या तपासासाठी तीन विस्तार अधिकाऱ्याची समिती नेमून सर्व रेकार्ड तपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला. त्यात हे दोघे दोषी आढळून आले. त्यांनी स्वतःच्या नावाने रक्कम काढली होती. याबाबत ग्रामविस्तार अधिकारी सुनील गुलाबराव माळी यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धीरज राउत हे करीत आहे.

Web Title: Sangamner Former Sarpanch and Gram Sevak of Sarole Plateau embezzled

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here