Home अहमदनगर शेतीचा बांध कोरल्याच्या कारणातून तलवारीने मारहाण

शेतीचा बांध कोरल्याच्या कारणातून तलवारीने मारहाण

Nevasa Beaten with a sword for digging a farm dam

नेवासा | Nevasa: शेतीच्या बांध कोराल्याच्या कारणावरून नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथील शेतकरी कुटुंबियांना तिघा जणांनी धारदार तलवार, चाकू, लाकडी दांड्याने माराहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना काल सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास घडली.

या मारहाणीत संगीता ताराचंद नवथर, सुभाष हरिश्चंद्र नवथर, प्रदीप ताराचंद नवथर  हे जखमी झाले आहेत. संगीता नवथर यांच्या फिर्यादीवरून संदीप भाऊसाहेब गवारे, रंजना भाऊसाहेब गवारे, भाऊसाहेब लक्ष्मण गवारे रा. पिंपरी शहाली ता, नेवासा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दुसरी फिर्याद रंजना भाऊसाहेब गवारे यांनी दिली यानुसार शेतीच्या बांधाच्या कारणावरून बटाटे सोलान्याच्या सोलान्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत संदीप भाऊसाहेब गवारे, रंजना भाऊसाहेब गवारे, भाऊसाहेब लक्ष्मण गवारे जखमी झाले आहेत. यानुसार पोलिसांनी संगीता ताराचंद नवथर, सुभाष हरिश्चंद्र नवथर, प्रदीप ताराचंद नवथर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Nevasa Beaten with a sword for digging a farm dam

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here