Home अहमदनगर संगमनेर: मित्रानेच केला मित्राचा घात कारण..

संगमनेर: मित्रानेच केला मित्राचा घात कारण..

Sangamner Murder Case friend killed the friend because

Ahmednagar | अहमदनगर | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावात जावळे वस्तीवर  एका टायर पंक्चर काढणार्‍याची धारधार शस्त्राने निघृणपणे हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. ही घटना गुरुवारी रात्री घडली.

यामध्ये अब्दुल मोहम्मद युनिस कादीर (वय 27, रा. चंदनापुरी. ता. संगमनेर) हा तरुण मयत झाला आहे. या मृताची माहिती समजताच संगमनेर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपासाची चक्रे फिरवत १२ तासांच्या आत याप्रकरणाचा छडा लावला आहे. घटनास्थळी एक टामी, आणि एक धारधार सत्तूर ताब्यात घेण्यात आला होता. यामध्ये कादीर याचा मित्रच नवश्याद अब्दुल अन्सारी (वय 45, रेहमतनगर, ता. संगमनेर) यानेच ही निघृण हत्या केल्याची उघडकीस आले आहे.  कारण, या दोघांनी एकत्र येत बेकरी सुरू केली होती. त्यात कादीर याने जास्त गुंतवणुक केली होती. अन्सारी हा पैसे देत नसल्यामुळे त्यांच्यात सातत्याने वाद निर्माण होत होते. या वादातूनच अन्सारी यास प्रचंड राग आल्याने त्याने आपल्या मित्रास रात्रीच्या सुमारास सत्तूरने भोकसून त्याचे जीवन संपविले.  हा प्रकार पोलिसांनी उघड केला असून अन्सारी यास संशयीत म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची अधिक चौकशी सुरू आहे. अवघ्या काही तासांतच संशियीत आरोपीस ताब्यात घेण्यात संगमनेर ग्रामीण पोलिसांना  यश आले आहे.

Web Title: Sangamner Murder Case friend killed the friend because

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here