Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: एकाच कुटुंबातील चौघांनी घेतले विष

अहमदनगर ब्रेकिंग: एकाच कुटुंबातील चौघांनी घेतले विष

Shrirampur Try Suicide Poison taken by four members of the same family

Ahmednagar Breaking | श्रीरामपूर | Shrirampur: श्रीरामपूर शहराजवळ असलेल्या गोंधवणी कॅनॉल परिसरात राहणार्‍या एकाच कुटुंबातील चार जणांनी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

या चारही जणांवर शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोंधवणी येथील कॅनॉल नजिक रहात असलेल्या सूर्यवंशी कुटुंबातील पती-पत्नी तसेच त्यांचा मुलगा व मुलीचा त्यात समावेश आहे.

रत्नाकर उत्तम सूर्यवंशी (वय 47), सौ. लक्ष्मी रत्नाकर सूर्यवंशी (वय 39), रुपेश रत्नाकर सूर्यवंशी (वय 19) व कु. रेणुका रत्नाकर सूर्यवंशी (वय 17) यांनी काल (शुक्रवारी) सायंकाळच्या सुमारास विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या चारही रुग्णांवर उपचार सुरु असून त्यांना डॉक्टरांच्या निगराणी खाली २४ तास ठेवण्यात आले आहे.  सूर्यवंशी कुटुंबातील या चौघांनी हे टोकाचे पाऊल का उचलले ? यामागीलकारण मात्र अद्याप समजू शकले नाही.

Web Title: Shrirampur Try Suicide Poison taken by four members of the same family

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here