Home अहमदनगर तोतया सीआयडी अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात, बनावट ओळखपत्र बनवून लुटमार

तोतया सीआयडी अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात, बनावट ओळखपत्र बनवून लुटमार

Ahmednagar Totaya CID officer in police trap

Ahmednagar | Parner | पारनेर: सीआयडी डिपार्टमेंटचा माणूस आहे असे सांगून सामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला सुपा येथील एका हॉटेलसमोरून पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. त्याच्याकडून बनावट ओळखपत्र, आधारकार्ड व काठी जप्त केली आहे.

याप्रकरणी प्रल्हाद जावळे (वय 52, वर्षे धंदा सेवानिवृत्त, रा. जावळे निवास, येवला, जि. नाशिक) यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये  बुधवार (दि.2) ते व मित्र अमीत मांडवडे, आरिफ तांबोळी, अण्णासाहेब जाधव आणि आणखी एक असे येवला येथून पुणे येथे गाडी क्रमांक एमएच 12 एव्ही 4600 मधून जात होतो. नगर-पुणे रोड दुपारी 1.15 वाजता सुपा गावाजवळ एका हॉटेलजवळ रोडवर एक अनोळखी अंदाजे 30 वय तसेच दुचाकी क्रमांक एमएच 12 डीए 1142 ही आमच्या कारला आडवी लावली. तसेच हातात लाकडी दांडके घेऊन, तुम्ही माझ्या वडिलांना येवला टोलनाका येथे शिविगाळ का केली, असे म्हणत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही,

तसेच शिविगाळ करत तुमचा काटा काढतो अशी धमकी देवून, मी सीआयडीचा माणूस आहे, पहा माझे ओळख असे सांगत ओळख पत्र आम्हाला दाखवले. परंतु आम्हास तो तोताया असल्याचा संशय आल्याने आम्ही आरडाओरडा केला. त्यामुळे जवळच्या हॉटेल मधील लोक आमचेकडे आले. मदतीसाठी आलेल्या लोकांच्या मदतीने संबंधित अनोळखी इसमास सुपा पोलीस स्टेशनला आणले व त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव संदिप खैरनार (रा. वरनपाडा ता. मालेगाव जि. नाशिक) असे असल्याचे सांगितले अशी फिर्याद दिली आहे. सुपा पोलिसांनी जावळे यांच्या फिर्यादीवरून खैरनार यास ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. खैरनार याने आणखी किती जणांना धमकावले व लुटले याची अधिक माहिती पोलीस करीत आहे.

Web Title: Ahmednagar Totaya CID officer in police trap

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here