Home संगमनेर संगमनेर हादरले: चालकाची बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

संगमनेर हादरले: चालकाची बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

Sangamner News driver committed suicide by hanging himself in the bus

संगमनेर | Sangamner News: पाथर्डी नाशिक या बसमध्ये याच बस क्रमांक एम.एच. १४ बी.टी. ४७४७ या बसमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून  आल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

सुभाष तेलोरे रा. कोल्हार कोलुबाइची ता. पाथर्डी अहमदनगर असे या मयत चालकाचे नाव आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने हे आत्महत्या करण्याचे पाउल उचलल्याचे  चिट्ठीवरून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र त्यात कोणाचे नाव व कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे सांगण्यात आले.

बसचे वाहक पोपट जावळे यांनी पोलिसांना माहिती कळविली. आज सकाळी पहाटे पाच वाजेच्य्ता सुमारास तेलोरे हे कामावर जाण्यासाठी तयार झाले होते. डेपोतून बाहेर पडताना ते पुढे निघाले मी पुढे जातो तुम्ही पाठीमागून या असे त्यांनी सहकार्यांना सांगितले. थोड्याच वेळाने वाहक जावळे बसमध्ये आले असता त्यावेळी चालक तेलोरे यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. बसला प्रवाशांना पकडण्यासाठी जो बार लावलेला असतो त्याला सुती दोरीच्या सहायाने तेलोरे यांनी गळफास घेतला.

Web Title: Sangamner News driver committed suicide by hanging himself in the bus

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here