Home संगमनेर संगमनेर तालुक्यातील या शाळेची भिंत फोडून एलईडी टीव्ही चोरीला

संगमनेर तालुक्यातील या शाळेची भिंत फोडून एलईडी टीव्ही चोरीला

Sangamner Taluka School Led tv Theft

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील पठारभागातील भोजदरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील डीजीटल रूमची भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी मागील बाजूने आत प्रवेश करत ३५ हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही चोरून (theft) नेल्याची घटना नुकतीच घडली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भोजदरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. डिजिटल रूममध्ये ४० इंची टीव्ही होता. बुधवारी १५ सप्टेंबर रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या नंतर ते शुक्रवार दिनांक १७ सप्टेंबर सकाळी आठ वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने डिजिटल रूमची मागील भिंत फोडून आत प्रवेश आत प्रवेश करत सामानाची उचाकापाचक केली. ३५ हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही चोरून पोबारा केला. हि चोरी मुख्याध्यापक गणपत कुर्हाडे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास देशमुख हे करीत आहे.

Web Title: Sangamner Taluka School Led tv Theft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here