Home अहमदनगर डोळ्यावर मिरची पूड टाकून १० लाख लुटणारा कामगारच निघाला मुख्य सूत्रधार

डोळ्यावर मिरची पूड टाकून १० लाख लुटणारा कामगारच निघाला मुख्य सूत्रधार

Ahmednagar News looting worker was the main facilitator

अहमदनगर | Ahmednagar News: शहरातील झोपडी कॅन्टीन येथील प्रकाश वाईन्स या दुकान व्यवस्थापकाच्या डोळ्यामध्ये मिरची पूड टाकून १० लाख रुपयांची लुट करणाऱ्या पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेला पकडण्यात यश आले आहे. यामध्ये दुकानातील कामगारच मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे. लखन नामदेव वैरागर वय २९ असे या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे.

प्रकाश वाईन्स या दुकानाचे व्यवस्थापक आशीर बशीर शेख रा. पंचवटीनगर सावेडी हे दिनांक १२ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून दिवसभरातील जमलेली रक्कम बॅगमध्ये ठेवून दुचाकीवरून घेऊन जात असताना सरस्वत बँकेजवळ पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यावर मिरची पावडर फेकून दुचाकीच्या पेट्रोल टाकीवर असलेली १० लाख ७० हजार रुपयांची रक्कम असलेली बॅग चोरली. शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. सीसीटीव्ही रेकॉर्डिंग तपासण्यात आले. यामध्ये कामगार लखन वैरागर याची भूमिका संशयास्पद आढळून आल्याने त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार आरोपी प्रमोद बाळू वाघमारे, विशाल भाऊसाहेब वैरागर रा. नेवासे, दीपक राजू वाघमारे रा, नागापूर यांना अटक करण्यात आली असून आणखी दोन साथीदार फरार आहेत.   

Web Title: Ahmednagar News looting worker was the main facilitator

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here