Home Accident News Accident: दोन मालवाहू ट्रक व दुचाकीच्या भीषणअपघातात चार जण जागीच ठार

Accident: दोन मालवाहू ट्रक व दुचाकीच्या भीषणअपघातात चार जण जागीच ठार

horrific accident involving two cargo trucks and a two-wheeler

Accident | पारनेर: नगर-पुणे महामार्गावर दोन मालवाहू ट्रक व दुचाकीच्या भीषण अपघात दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहीती मिळाली आहे.

पारनेर तालुक्यातील जातेगाव  शिवारात हा दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून सुपे पोलिस क्रेनच्या सहाय्याने वाहनांमध्ये, वाहनाखाली अडकलेले मृतदेह काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

पुण्यावरून नगरकडे चाललेल्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबल्यामुळे पाठीमागून येणाया ट्रकची कंटेनरला जोराची धडक बसली. दरम्यानच्या काळात दोन्ही वाहनांच्या मधोमध चाललेल्या दुचाकीलाही ट्रकने ठोकर दिल्याने दुचाकी ट्रकखाली जाउन त्यावरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

अचानक ब्रेक लावण्यात आल्याने ट्रकमधील  पाईप बॉडी तोडून केबीनमध्ये शिरल्याने ट्रकच्या चालकासह क्लिनरचा मृत्यू झाल्याची माहीती आहे. या अपघातात आणखी किती व्यक्ती मयत व जखमी झाले आहेत याची अद्याप माहिती समोर आली नाही. मात्र हा अपघात इतका भीषण होता की अंगावर शहारे आणणारे क्षणचित्रात आपण पाहू शकतो.

Web Title: horrific accident involving two cargo trucks and a two-wheeler

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here