संगमनेर: रामवाडी(मालूंजे) शाळेत गरुजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या व दप्तर वाटप
जिल्हा परिषदेच्या रामवाडी(मालूंजे) शाळेत शिवजयंती उत्सव युवक समिती संगमनेरकडून गरुजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या व दप्तर वाटप
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी (मालूंजे) तालुका संगमनेर या शाळेत शिवजयंती उत्सव युवक समिती संगमनेर यांचे वतीने सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या व गरजू विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप करत मदतीचा हात दिला.
रामवाडी शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिवजयंती उत्सव युवक समितीकडून वह्या व दप्तर वाटप केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले, व खूप आनंद झाला.
शिवजयंती उत्सव समितीचा हा उपक्रम खूपच स्तुत्य आहे. यामुळे होतकरू गरजू,होतकरू व हुशार विद्यार्थ्यांच्या अभ्यासात नक्कीच प्रगती होणार असल्याचे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक केशव घुगे यांनी केले.
याप्रसंगी युवक समितीचे अध्यक्ष दिपकजी वनम, नगरसेवक शैलेश कलंत्री, शिवसेना शहरप्रमुख अमरभाऊ कतारी,राहुल नेहुलकर,अमोल डुकरे,संतोष गायकवाड,अक्षय दाणी,तौफिक शेख,बाळा नेवासकर, श्रेयस कर्पे आदींसह मालूंजे शाळेचे उपाध्यापक प्रवीण वाकचौरे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आभार उपाध्यापिका श्रीमती.सुरेखा आंधळे मॅडम यांनी मांडले.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.