संगमनेरात वाळू उपशाविरोधात प्रवरा नदीपात्रात झोपून आंदोलन
संगमनेर | Sangamner: प्रवरा नदीपात्रातील वाळू उपसा थांबविण्यासाठी नागरिकांनी बुधवारी गंगामाई घाट परिसरात थेट नदीपात्रात झोपून अनोखे आंदोलन केले आहे.
कसारा दुमाला ते संगमनेर खुर्द येथील परिसरात रात्र आणि दिवस मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. त्यामुळे नदीपरिसर मंदिरांना धोका निर्माण झाले. मोठमोठे खड्डे पडले आहे. येथे वाळू उपसा बंद व्हावा अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र याकडे कोणी लक्ष देत नाही. वाळू उपसा न थांबविल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
कालही खांडगाव परिसरातील नागरिक वाळू उपसा बंद करण्यासाठी नदी पात्रात उतरून आंदोलन केले होते.
तसेच अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्याविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट यांचे उत्तर महाराष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत दारोळे प्रांत कार्यालयासमोर उपोषणास बसले होते.
Web Title: Sangamner Sleeping agitation in Pravara river