Home क्राईम तरुणीचा आंघोळीचा फोटो व व्हिडियो केले व्हायरल

तरुणीचा आंघोळीचा फोटो व व्हिडियो केले व्हायरल

photo and video of the young lady taking a bath went viral

नागपूर: एका अल्पवयीन आरोपीने शेजारी राहत असलेली तरुणी अंघोळ करत असतानाचा मोबाईलमध्ये व्हिडियो बनविला तसेच या व्हिडियोतील स्क्रीन शॉट घेऊन ते सोशियल मेडीयावर व्हायरल केल्याची घटना तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

आरोपी हा अल्पवयीन १७ वर्षाचा आहे. तर २२ वर्षीय तरुणी सोमवारी सायंकाळी अंघोळ करत असताना आरोपीने तिचा लपून छपून व्हिडियो बनविला. तसेच व्हिडियो मधील स्क्रीन शॉट घेऊन ते फोटो त्याने सोशियल मेडीयावर व्हायरल केले. हा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलीच्या चुलत भावाने तहसील ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला लगेच ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले. त्यानुळे पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्हा दाखल करून सुचनापत्र देऊन त्यास पालकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे.   

Web Title: photo and video of the young lady taking a bath went viral

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here