Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात १६ करोनाबाधितांची वाढ एकूण १,७२० रुग्ण

Sangamner: संगमनेर तालुक्यात १६ करोनाबाधितांची वाढ एकूण १,७२० रुग्ण

Sangamner Taluka 16 corona infected 

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात सोमवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात शहरात तीन तर ग्रामीण भागात १३ असे १६ करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या १७२० इतकी झाली आहे.

खासगी प्रयोगशाळेच्या अहवालात मालदाड रोड येथे ३९ वर्षीय पुरुष, गणेशनगर ४५ वर्षीय पुरुष,घुलेवाडी येथे १७ वर्षीय तरुणी आढळून आले आहेत तर शासकीय प्रयोगशाळा अहवालात घोडेकर मळा येथे ३७ वर्षीय तरुण, घुलेवाडी येथे २१ वर्षीय तरुण, ढोलेवाडी येथे ५२ वर्षीय व्यक्तीला करोनाची बाधा झाली आहे.

अॅटीजेन चाचणीत घुलेवाडी येथे ५०,४७,१७ वर्षीय महिला, १३ वर्षीय मुलगा, चिंचपूर येथे ६५ वर्षीय पुरुष, चिकणी येथे ४६,३३,२६ वर्षीय पुरुष, ३१ वर्षीय महिला, बोटा येथे ४५ वर्षीय पुरुषाला करोनाची लागण झाले आहेत. असे सोमवारी १६ रुग्णांची तालुक्यात वाढ झाली आहे.

दरम्यान रविवारी सायंकाळी ४८ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या रुग्णसंखेत वाढ झाली आहे.

Web Title: Sangamner Taluka 16 corona infected 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here