Home अहमदनगर Ahmednagar: जिल्ह्यात ४२१ नवे रुग्ण तर ७०० रुग्णांना डिस्चार्ज

Ahmednagar: जिल्ह्यात ४२१ नवे रुग्ण तर ७०० रुग्णांना डिस्चार्ज

Ahmednagar 421 new infected and 700 corona free

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात सोमवारी ४२१ नवीन करोना रुग्णांची  भर पडली आहे. यामुळे सध्या उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या ३३०४ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांचा आकडा २१ हजार ४७२ वर पोहोचला आहे.

जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत २०७, अॅटीजेन टेस्टमध्ये ६५ आणि खासगी प्रयोगशाळेत १४९ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये अहमदनगर १६२, संगमनेर ३०, राहता १५, पाथर्डी १९, नगर ग्रामीण ३८, श्रीरामपूर १६, नेवासा २२, पारनेर १४, अकोले २८, राहुरी २३, कोपरगाव १६, जामखेड १७, कर्जत १९, शेवगाव २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

सोमवारी ७०० रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये नगर शहर २९७, संगमनेर ३३, राहता २९, पाथर्डी २४, नगर ग्रामीण ५०, श्रीरामपूर २३, भिंगार २०, नेवासा १४, श्रीगोंदा ३२, पारनेर १६, अकोले ३२, राहुरी ११, शेवगाव ५, कोपरगाव ४९, जामखेड ५१, कर्जत ४ आणि मिलिटरी हॉस्पिटल १० अशा रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत रुग्ण बरे झालेल्याची संख्या १७ हजार ८७६ इतकी झाली आहे. हे प्रमाण ८३.२५ टक्के इतके आहे.

Web Title: Ahmednagar 421 new infected and 700 corona free

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here