Home शेवगाव विवाहितेने चार वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

विवाहितेने चार वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Shevgaon Married woman commits suicide by jumping into a well  

शेवगाव | Shevgaon: शेवगाव तालुक्यातील कोळगाव येथील एका विवाहितेने ४ वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण अजून अस्पष्ट आहे.

उषा गणेश झिरपे वय २४ व गायत्री गणेश झिरपे असे मयत झालेल्या मायलेकींची नावे आहेत. मयत महिलेचा पती गणेश झिरपे याने पोलिसांत याबाबत माहिती दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी सकाळी उषा झिरपे ही शेतात गेली नाही तिने शेतात जाण्यास आपल्या पतीला नकार दिला आणि मुलीबरोबर ती घरीच थांबली. सायंकाळी गणेश झिरपे घरी आल्यानंतर उषा व मुलगी दिसली नाही. त्यामुळे त्याने नातेवाईक यांच्याकडे संपर्क केला मात्र त्यांचा तपास लागला नाही. सोमवारी सकाळी त्यांच्याच शेतात असलेल्या विहिरीच्या कडेला उषाच्या चपला आढळून आल्या. विहिरीत गळ टाकून शोध घेण्यात आला असता दोघींचेही मृतदेह आढळून आले.

या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व पथक घटनास्थळी दाखल झाले होते. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Shevgaon Married woman commits suicide by jumping into a well  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here