Akole: अकोले तालुक्यात आज २० करोना रुग्णांची वाढ
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज सकळीच आढळले तब्बल २० कोरोना बाधित. कुंभेफळ हॅाटस्पॅाट तर म्हाळादेवी, इंदोरी, कोतुळ, बेलापुर,पाडाळणे सह अकोले शहरातही कोरोना बाधित आढळून आले आहेत.
दोन दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या अहमदनगर प्रयोगशाळेतील काही अहवाल आज सकाळीच प्राप्त झाले असुन यामध्ये तब्बल १७ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे यामध्ये कुंभेफळ येथील ७० वर्षीय पुरुष, ५८वर्षीय पुरूष, २६ वर्षीय युवक, १४ वर्षीय युवक, ५३ वर्षीय महीला, ०२ वर्षीय मुलगी, ११वर्षीय मुलगी, ०२ वर्षीय मुलगी तर म्हाळादेवी येथील २६ वर्षीय महिला, ०७ वर्षीय मुलगा, ०२ वर्षीय मुलगा,व कोतुळ येथील २८ वर्षीय पुरूष, २६ वर्षीय महीला, बेलापुर येथील ६६ वर्षीय महीला, दोरी येथील ६० वर्षीय पुरूष, तर शहरातील पेट्रोल पंपाजवळील ०८ वर्षीय मुलगा अशी एकुण १७ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात पाडाळणे येथील ३६ वर्षीय महिला पॅाझिटीव्ह आलेने आज सोमवारी सकाळीच एकुण १८ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
तर देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या ॲन्टीजन टेस्टमध्ये टाहाकारी येथील ७० वर्षीय पुरुष,५० वर्षीय महीला अशा दोन व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आल्याने दुपारपर्यत तालुक्यातील २० व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. गणोरे व ब्राम्हणवाडा येथील ॲन्टीजन टेस्ट चा अहवाल व अहमदनगर येथील काही पेंडीग अहवाल येणे अद्याप बाकी आहे. तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ५५१ झाली आहे
Web Title: Akole taluka increased 20 infected coronaviruses today