Home Accident News Accident: संगमनेरात कार व दुचाकीचा भीषण अपघात

Accident: संगमनेरात कार व दुचाकीचा भीषण अपघात

Sangamner taluka Car and bike Accident

संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारात कार व दुचाकीचा भीषण अपघाताची घटना  सोमवारी (दि. २०) रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर तळेगाव दिघे शिवारात हॉटेल सौरभ नजीक घडली. या अपघातात  दुचाकीस्वाराच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाला आहे.

तळेगाव दिघे मार्गे असलेल्या लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याने निमोण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिश चांदोरकर नगरहून हे निमोणच्या दिशेने वॅग्नर कार (एमएच १५ एफएन ७५४० ) मधुन प्रवास करीत असताना समोरून आलेल्या दुचाकीची (क्र. एमएच १५ जीएच ८६४३ ) व वॅग्नर कारची धडक होत भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार सुनील जगन्नाथ भडांगे (रा. कौठेकमळेश्वर) यांच्या डोक्याला मार लागल्याने तो जबर जखमी झाले. त्यास तातडीने प्रथम संगमनेर व त्यानंतर पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Web Title: Sangamner taluka Car and bike Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here