Home अहमदनगर न्यायालयाचा दणका: साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अधिकार गठीत

न्यायालयाचा दणका: साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अधिकार गठीत

Ahmednagar News Powers of the Board of Trustees of Sai Baba Sansthan constituted

शिर्डी | Ahmednagar News: श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेवर नव्याने नेमलेले ११ सदस्यांची नेमणुकीबाबत शासनाच्यावतीने न्यायालयात कोणतीही सूचना न देता परस्पर पदभार स्वीकारला असून संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अधिकार न्यायालयाने गोठवले आहे.

यामुळे नवनियुक्त विश्वस्त मंडळाने कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नये असा आदेश उच्च न्यायालयाने  दिला आहे, तोपर्यंत संस्थानचा कारभार तदर्थ समिती पाहणार असल्याचे आदेश उच्च न्यायालयाने दि. २१ रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान दिल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वतीने अँड अजिंक्य काळे यांनी दिली.

दरम्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवस्थान असलेल्या श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थेवर राज्यातील जनतेला कायद्याचे विश्वस्त मंडळ पाहिजे आहे, काय द्यायचे नाही असा उपरोधिक सवाल उपस्थित करत सरकारने नियुक्त केलेल्या ११ विश्वस्तांची बॉडी पूर्णपणे बेकायदेशीर व नियमबाह्य असून या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय काळे दिली होती त्यानुसार त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली.

यावर दि.२१ रोजी सुनावणी झाली असून यापुर्वी न्यायालयाच्या आदेशानुसार तदर्थ समिती कामकाज पहात होती, पुढील आदेशापर्यत विश्वस्त मंडळाच्या वतीने कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यात येऊ नये असा आला असून तोपर्यंत तदर्थ समिती सदरचे कामकाज बघतील असा आदेश न्यायालयाकडून देण्यात आला आहे.

Web Title: Ahmednagar News Powers of the Board of Trustees of Sai Baba Sansthan constituted

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here