Home Accident News संगमनेर तालुक्यात टेम्पो व कंटेनरचा अपघात, एक ठार

संगमनेर तालुक्यात टेम्पो व कंटेनरचा अपघात, एक ठार

Sangamner taluka Konchi tempo container Accident

संगमनेर(Sangamner): कोल्हार संगमनेर राज्यमार्गावर कोची शिवारात भाजीपाला वाहतूक करणाऱ्या टेम्पोची व कंटेनरचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला आहेत तर तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडला.

संगमनेरकडून लोणीकडे टेम्पो भाजीपाला घेऊन जात असताना संगमनेरला जात असलेला कंटेनर यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात चालक खंडू रामा वीर ओझर जि. नाशिक हा ठार झाला. प्रेमचंद रजपूत वय ३६, दीपक रजपूत, मंगेश येवले वय ३३ तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातातील जखमींना उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करण्यात आले. वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Sangamner taluka Konchi tempo container Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here