लाच घेताना पकडल्याने अधिकाऱ्याने नोटा गिळल्या
अकोले(Akole): अकोले तालुक्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे हे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकले आहे. लाच स्वीकारताना पथक आल्याने या अधिकाऱ्याने नोटा गिळल्या. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
नोटा गिळल्यामुळे रेंगडे यांना एका खासगी रुग्णालयात सोनोग्राफी तपासणीसाठी नेण्यात आले होते.
आढळा भागातील एका गावात दलित वस्ती सुधार योजनेतून काम झाले. या कामाच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी ठेकेदाराकडे ४ हजार रुपयांची मागणी केली होती. ही लाच घेत असताना गटविकास अधिकारी रेंगडे यांना पकडण्यात आले.
नाशिक विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या पथकाने गुरुवारी दोन वाजता पंचायत समिती येथे सापळा रचून कारवाई करण्यात आली. वैद्यकीय तपासणीसाठी गटविकास अधिकारी यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. या प्रकरणामुळे पंचायत समितीचे अधिकारी वर्गामध्ये वेगवेगळ्या चर्चना उधाण आले आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Akole BDO swallowed the notes after being caught taking a bribe