Home संगमनेर Sangamber Lockdown: संगमनेरमध्ये पूर्ण लॉकडाऊनचे संकेत

Sangamber Lockdown: संगमनेरमध्ये पूर्ण लॉकडाऊनचे संकेत

Sangamner Taluka May be future lockdown

संगमनेर | Lockdown: संगमनेरसह जिल्ह्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणांत रुग्णसंख्या वाढत आहे. हि स्थिती अशीच राहिली आणि नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर पुन्हा एकदा टाळेबंदी हाच एकमेव पर्याय असल्याचे संकेत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. साधारण गेल्या दीड वर्षातील उच्चांकी रुग्णसंख्या सप्टेंबर महिन्यात आढळून आली आहे. यचाच अर्थ तालुक्यात अजून तिसरी लाट आटोक्यात आली नाही. गेल्याच आठवड्यात आपल्या न्यूजने यावर प्रकाश टाकला होता. या पार्श्वभूमीवर जिलाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले आणि जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी संगमनेरला भेट देऊन तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेताला.

जिल्हाधिकारी भोसले म्हणाले जिल्ह्यात संगमनेरसह पारनेर राहता या तालुक्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात नगर जिल्ह्यातून होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क असून ठीकठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात येत आहे. ज्या गावांमध्ये रुग्णसंख्या अधिक आहे. त्या गावांकडे आरोग्य विभाग चाचणी व लसीकारानावर लक्ष दिले जात आहे.रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. नागरिकांनी जर कोरोनाची लक्षणे आढळली तर त्यांनी घरात न राहता प्रशासनाने ज्या ठिकाणी विलगीकरण कक्ष केली आहे त्याठिकाणी राहावे. यासाठी लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे. त्यांनी मदत करण्याचे आवाहन डॉ. भोसले यांनी केले आहे.

यावेळी प्रांतधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, पोलीस निरीक्षक मुकुंद देह्मुख, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचोरीया, तालुका वैद्यकीय अधिकारी सुरेश घोलप आदींसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.  

Web Title: Sangamner Taluka May be future lockdown

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here