Home अहमदनगर मुदत संपून वर्ष लोटले अखेर जिल्ह्यात निवडणुकीचा बिगुल वाजला

मुदत संपून वर्ष लोटले अखेर जिल्ह्यात निवडणुकीचा बिगुल वाजला

Ahmednagar News election trumpet sounded in the district

अहमदनगर | Ahmednagar News: कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांना दिलेली स्थगिती सहकार खात्याने उठविली आहे. जिल्ह्यातील नगर व पारनेर वगळता १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. येत्या २३ ऑक्टोबरपासून संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु होईल असे प्रशासनाने सांगितले.

जिल्ह्यामधील १२ बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपून एक वर्ष झाले आहे. कोरोनामुळे निवडणुकांना शासनाने स्थगिती दिली होती.

जिल्ह्यातील जामखेड, कर्जत, संगमनेर, राहता,राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, अकोले, कोपरगाव, पाथर्डी, श्रीगोंदा येथील कृषी उत्पना बाजार समितीच्या संचालक मंडळाला २३ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ मिळाली होती. ती संपत येत आहे. त्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरु करून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा आदेश सहकार खात्याचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांनी जिल्हा उप निबंधकांना दिला आहे.  

Web Title: Ahmednagar News election trumpet sounded in the district

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here