Home संगमनेर संगमनेर तालुक्यात आज १९ करोनाबाधित आढळले

संगमनेर तालुक्यात आज १९ करोनाबाधित आढळले

Sangamner taluka today 19 corona infected

संगमनेर(Sangamner): संगमनेर तालुक्यात आज गुरुवारी नव्याने १९ करोनाबाधित आढळून आले आहेत. काल बुधवारी २२ कैद्यांना करोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले होते. संगमनेर तालुक्यातील करोनाबाधितांची सातशे पार झाली आहे.

या १९ रुग्णांमध्ये ओझर खुर्द येथील ३६ वर्षीय महिला, १५ वर्षीय मुलगा, ५२ वर्षीय पुरुष, निमोण येथे ६५ व ६० वर्ष महिला तर ८२,१५,१०,७१ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. रायतेवाडी येथे एकाच कुटुंबातील सात जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये ४२,३५ वर्षीय महिला, ४०,१९,१६,१७,१६ वर्षीय पुरुष करोना पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. जोर्वे येथील ३६ वर्षीय पुरुष, कुरण येथे ४५ वर्षीय पुरुष यांना करोनाची लागण झाली आहे.

तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ७०२ इतकी झाली आहे. दरम्यान आज तालुक्यातील १२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तालुक्यातील करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासन यावर कार्य निर्णय घेत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Sangamner taluka today 19 corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here