Home Accident News कुलर सुरु करताना एकमेकींना वाचविताना तीन बहिणीचा शॉक बसून मृत्यू

कुलर सुरु करताना एकमेकींना वाचविताना तीन बहिणीचा शॉक बसून मृत्यू

Yavatmal Sisters dies of electric shock while starting cooler Accident

यवतमाळ(Yavatmal): कुलर चालू करीत असताना विजेचा शॉक लागून तीन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एकमेकीना वाचवीत असताना सहा वर्षाखालील तीन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत झाला आहे.

रिया भूसेवार वय सहा वर्ष, मोनिका भूसेवार वय ४ वर्ष, मोंटी भूसेवार वय दोन वर्ष या तिघींचा अपघात होऊन मृत्यू झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील श्रीरामपूरमध्ये भूसेवार कुटुंबाच्या  राहत्या घरात ही दुर्दैवी घटना घडली.

मुलींचे आई वडील शेतावर गेले होते. घरात या तीनही बहिणी जेवण करत बसल्या होत्या. त्यावेळी मोठी बहिण कुलर चालू करण्यास गेली असता विजेचा जोरदार झटका बसल्याने तिथे ती चिकटली. बहिणीला वाचविण्यासाठी गेलेल्या दुसरी तिलाही धक्का बसला त्यानंतर तिसरी बहिणीला वाचविण्यासाठी गेली असता तिलाही शॉक लागून तीनही बहिणींचा मृत्यू झाला.

आई वडील घरी परतल्यावर तीनही मुली पडलेल्या पाहून एकच टाहो फोडला. या घटनेने भूसेवार कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Yavatmal Sisters dies of electric shock while starting cooler

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here