Home Marathi Batmya Today Live Maharashtra Coronavirus News:  राज्यात आज करोना रुग्णांचा उच्चांक गाठला

Maharashtra Coronavirus News:  राज्यात आज करोना रुग्णांचा उच्चांक गाठला

Maharashtra Coronavirus News today highest record

Maharashtra Coronavirus News:

मुंबई: राज्यात आज दिवसभरात मागील करोना रुग्ण नोंदीचा विक्रम मोडीत काढत नवीन उच्चांक गाठला आहे. राज्यात दिवसभरात ११ हजार १४७ करोना रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात आज दिवसभरात २६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत १ लाख ४८ हजार १५० रुग्ण उपचारघेत आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.३७ टक्के आहे. राज्यात मृत्यूदर ३.५८ टक्के आहे.

राज्यातील एकूण करोनाबाधितांचा आकडा ४ लाख ११ हजार ७९८ इतका झाला आहे. मृत्यूचा आकडा १४ हजार ७२९ इतका आहे. दिवसभरात आठ हजार ९६० रुग्ण बरे झाले आहे. राज्यात आत्तापर्यंत २ लाख ४८ हजार ६१५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आज दिवसभरात १ हजार २०८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर ५३ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत सध्या २० हजार १५८ रुग्ण उपचार घेत आहेत. ठाणे सध्या ३१ हजार ९२३ रुग्ण उपचार घेत आहेत. पुणे जिल्ह्यात ४८ हजार ५१५ रुग्ण सक्रीय उपचार घेत आहेत. मुंबईच्या तुलनेत ठाणे व पुणे यांची सक्रीय रुग्णाची संख्या जास्त आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Maharashtra Coronavirus News today highest record

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here