Home नेवासा नेवासा कारागृहात २१ कैद्यांना करोनाची लागण

नेवासा कारागृहात २१ कैद्यांना करोनाची लागण

Nevasa 21 inmates infected with coronavirus

नेवासा(Nevasa): बुधवारी एका कैद्याला करोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्यामुळे गुरुवारी कारागृहातील ४७ कैद्यांची चाचणी करण्यात आली. या चाचणीत तब्बल २१ कैद्यांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर, संगमनेर आणि आता नेवासा येथील कारागृहात कैद्यांना करोनाची लागण झाली आहे. यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी पोलीस निरीक्षकांना पत्र देत याबाबत माहिती दिली.

नेवासा खुर्द येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरुवारी सर्व कैद्यांची चाचणी घेतली. त्यात २१ जणांना लागण झाल्याचे उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. करोना बाधित कैद्यांची रवानगी आता नेवासा फाटा येतील समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात करण्यात आली आहे. येथे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नेवासा शहर व ग्रामीण भागात करोनाच्या रुग्णांची पडत आहे. ग्रामीण भागात शिरकाव झाल्यामुळे प्रशासानापुढे मोठे आव्हान उभे आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Nevasa 21 inmates infected with coronavirus

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here