Sangamner: संगमनेर तालुक्यात दोन दिवसांत ३१ करोनाबाधितांची वाढ
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात बुधवारी १७ करोना बाधित आढळून आले आहेत. संगमनेर शहरात १३ जण तर ग्रामीण भागातून चार जण बाधित आढळून आले आहेत.
संगमनेर तालुक्यात बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार संगमनेर शहरात २१ व ४७ वर्षीय पुरुष, नवीन नगर रोड २९ वर्षीय पुरुष, रंगारगल्ली येथे ४५ वर्षीय पुरुष, गणेशनगर येथे ७०,७०,५४,२२ वर्षीय पुरुष, ३७, ४७,७१ वर्षीय महिला, ११ वर्षीय मुलगा, अकोले नाका येथे ४५ वर्षीय पुरुष असे १३ जण बाधित आढळून आले आहेत.
तर ग्रामीण भागातून घुलेवाडी येथे २१ व २० वर्षीय तरुण, वरवंडी येथे ५९ वर्षीय पुरुष, निमगाव जाळी येथे ३९ वर्षीय पुरुष चार जण बाधित आढळून आले आहे.
तर मंगळवारी १४ करोनाबाधितांची वाढ झालेली आहे. यामध्ये शहरात १० तर ग्रामीण भागातून चार जण बाधित आढळून आले आहेत.
संगमनेर तालुक्यात मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात नवीन नगर रोड येथे ७० वर्षीय महिला, ८० वर्षीय पुरुष, अभिनव नगर येथे १८ वर्षीय तरुणी, २० वर्षीय तरुण, ५३ वर्षीय पुरुष, ४९ वर्षीय महिला, सावतामाळी नगर २६ वर्षीय महिला, संगमनेर येथून ५५ व ३० वर्षीय पुरुष, गणेशनगर येथे ४९ वर्षीय पुरुष असे १० जण बाधित आढळून आले आहेत.
तर ग्रामीण भागातून चौरकौठे येथे ५० वर्षीय महिला, सारोळे पठार येथे ५८ वर्षीय पुरुष, झोळे येथे ६३ वर्षीय पुरुष, जवळे कडलग येथे ४० वर्षीय पुरुष असे चार बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Sangamner Taluka two days 31 corona Patient