Home संगमनेर संगमनेर: गळा दाबून खून करून दागिने लंपास करणारा आरोपी गजाआड

संगमनेर: गळा दाबून खून करून दागिने लंपास करणारा आरोपी गजाआड

Sangamner Accused of strangling to death with jewelry

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर गावात भरदिवसा १९ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सावित्राबाई मोगल शेळके या महिलेचा गळा दाबून खून करत अंगावरील दागिने लंपास करणारा आरोपी जालना जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपी भाऊसाहेब झुंबर येलमामे वय ३० रा. मिरपूर ता. संगमनेर व अश्विनी दत्तात्रय पंडित रा. फतेबाद ता. श्रीरामपूर या दोघांना संगमनेर तालुका पोलिसांनी अकनी ता. मंठा जि. जालना या ठिकाणाहून ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे.

याप्रकरणी सनी भगवान गायकवाड रा. अंभोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावातील सावित्राबाई मोगल शेळके या वृद्धेचा घरात एकटीच असताना अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश करत गळा दाबून खून केला होता. तिच्या अंगावरील ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी, सहा हजार रुपये किमतीचे सोन्याची नथ, कानातील कर्णफुले तसेच लहान मुलीच्या कानातील एक ग्राम सोन्याच्या बाळ्या असा ऐवज लंपास केला होता.  

Web Title: Sangamner Accused of strangling to death with jewelry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here